लाल किल्ला स्फ़ोटप्रकरणी महत्वाची अपडेट ; आरोपी डॉक्टरचा धक्कादायक खुलासा, ब्लास्ट घडवण्यासाठी App चा वापर…


दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी कारचा भीषण स्फ़ोट झाला. या कार प्रकरणातील आरोपी डॉक्टर उमरने आता धक्कादायक खुलासे केले आहेत. स्फोटकांचा पुरवठा, साठवणूक आणि संपूर्ण डाव रचण्यासाठी सिग्नल ॲपचा वापर केला गेला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.. अमोनियम नायट्रेट आणि इतर रसायने खरेदी करून, त्याची माहिती ॲप ग्रुपमध्ये दिली जात असे. पाकिस्तानी हँडलर्सच्या सूचनेनुसार हे षडयंत्र रचले गेले असून, त्यात अनेक डॉक्टरांचा सहभाग समोर आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्ली ब्लास्ट प्रकरणात डॉक्टर उमरची सर्वात महत्त्वाची भूमिका होती. डॉक्टर उमरने अमोनियम नायट्रेट, ट्रायएसिटोन ट्रायपरॉक्साईड वा अन्य केमिकल्स खरेदी करायचा. त्याची संपूर्ण माहिती त्यांच्या ग्रुपमध्ये टाकली जायची. किती प्रमाणात हे केमिकल्स खरेदी करण्यात आले? कोणत्या स्त्रोतांकडून घेण्यात आले आणि पुढे कशी तयारी करायची? याची डिटेल्स या ग्रुपमध्ये शेअर केली जायची. अमोनियम नायट्रेट , टीएटीपी, सल्फर डायऑक्साईडसहीत बहुतेक स्फोटक केमिकल्स आणि टायमर, वायर सारखी उपकरणे उमरने खरेदी केल्याचं डीजिटल फुटप्रिंट्समधून स्पष्ट झालं आहे. आता या प्रकरणात आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जैश ए मोहम्मदच्या पकडण्यात आलेल्या मॉड्युलशी संबंधित डॉक्टरांची यंत्रणांनी कसून चौकशी सुरू केली आहे. डॉक्टरच्या मोबाईलमधून अत्यंत धक्कादायक खुलासे झाले असून महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. आरोपींच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून त्यात सिग्नल ॲप आढळून आला आहे. आरोपी दहशतवादी कारवायांसाठी सिग्नल ॲपचा वापर करत असल्याचं उघड झालं आहे. या ॲपच्या ग्रुपचा ॲडमिन फरार आहे. त्याचं नाव डॉक्टर मुजफ्फर असल्याचं समोर आलं आहे.. तसेच या ग्रुपमध्ये डॉक्टर उमर, डॉक्टर मुजम्मिल, डॉक्टर आदिल आणि डॉक्टर शाहीन होते, अशी माहितीही तपासातून उघड झाली आहे. यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!