पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरात उद्या ‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद, जाणून घ्या…


पुणे : पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. शहरात गुरुवारी अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. उद्या पुण्यातील कात्रज, स्वारगेट, महर्षी नगर यासह अनेक पेठांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याबाबत माहिती अशी की, पुण्यातील तळजाई टाकीतील मुख्य व्हॉल्व्हचे व मुख्य जलवाहिनीचे तातडीचे व अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

त्यामुळे भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार, चंद्रभागा, निलगिरी चौक, जिजामाता भुयारी मार्ग परिसर, आंबेगाव बुद्रुक, धनकवडी, तळजाई पठार, मेघदूत सोसायटी, आनंद भवन सोसायटी परीसरामधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा सुरू होईल.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. पुणे शहरात जलवाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.

पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच पाणी जपून वापरावे असं आवाहन करण्यात आलं आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत काम सुरू केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत पाणी पुरवठा सुरळीत सुरू होईल. प्रशासनाने याबाबत सूचना दिल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!