कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! जंजिरा किल्ला पुढील तीन महिने राहणार बंद…

रायगड : रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील मुरुड जंजिरा हा किल्ला नेहेमीच त्याच्या इतिहासाने आणि बांधणीने पर्यटकांसाठी आकर्षक राहिला आहे. हा किल्ला तब्बल 350 वर्ष अजिंक्य राहिला. छत्रपती शिवाजी महाराजच नाहीत तर ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच अशा कुणालाही हा किल्ला जिंकता आला नव्हता.

यामुळे या किल्ल्याला मोठा इतिहास लाभला आहे. पर्यटकांना या किल्ल्यात असं काय आहे याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. त्यामुळे नेहमी या किल्ल्याला पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. उन्हाळ्यात सुट्टी असल्याने अनेकजण याठिकाणी मोठी गर्दी करत असतात.
असे असताना आता हा किल्ला आता पुढचे तीन महिने बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. असं असलं तरी शेवटच्या दिवसांतही जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. आता सुट्टी संपण्याच्या मार्गावर असून पावसाची चाहूल लागली आहे. जंजिरा किल्ला हा मंगळवार २६ मे पासून पुढील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात येणार असल्याने पर्यटकांनी जंजिराकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली आहे.

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात वाढणाऱ्या वादळी वाऱ्यांचा वेग, उंच लाटा आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून मेरीटाईम बोर्डाने किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात देखील कोकणात पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. याठिकाणी देखील पर्यटन येत असतात.

आता शेवटी येत्या शनिवार-रविवारी जंजिरा किल्ल्यावर विक्रमी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिकीट खरेदीसाठीही पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. बंदीपूर्वी अखेरची सफर करण्यासाठी अनेक पर्यटकांनी मुरुडला पसंती मिळत आहे. यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायालाही मोठी चालना मिळत आहे.