पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! धुलिवंदनला मेट्रोच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या..

पुणे : राज्यासह देशभरामध्ये होळी आणि धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. पुण्यामध्ये देखील हा उत्साह दिसून येत आहे. पुणेकरांसाठी मेट्रो सेवेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुण्यातील मेट्रोसेवा ही सणानिमित्त बंद राहणार आहे.
याबाबत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. होळी/धुळवड सणामुळे शुक्रवार, १४ मार्च २०२५ रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद राहील. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली आहे.
आज (ता.१३) होळीचा सण आहे. तर उद्या धुलिवंदन (ता.१४) साजरे केले जाणार आहे. यामुळे धुलिवंदनच्या दिवशी पुणे मेट्रो बंद राहणार आहे. राज्यात आज होळी साजरी होत आहे. यानिमित्ताने पुणे मेट्रोकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे.
पुणे मेट्रोकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे. उद्या १४ मार्च रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत पुण्यात मेट्रो सेवा बंद राहणार आहे. दुपारी ३:०० ते रात्री ११:०० या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरु असेल. याबाबत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी टि्वट करीत माहिती दिली आहे.
दरम्यान, पुणे मेट्रोने सर्व स्थानके आणि प्लॅटफॉर्मवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची योजना आखली आहे. रविवारी पुणे महानगरपालिका (पीएमसी) स्थानकाजवळील रुळांवर चढून राष्ट्रवादी-सपाच्या निदर्शकांनी मेट्रोचे कामकाज दोन तास थांबवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.