वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी!! आता सर्व गाड्यांना एचएसआरपी नंबरप्लेट बंधनकारक असणार, अन्यथा दंड होणार…


नवी दिल्ली : तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट म्हणजेच एचएसआरपी नंबरप्लेट नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण तुम्हाला ३१ मार्चनंतर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने असे पत्रक काढले आहे. त्यामुळे लवकरात लवकर HSRP नंबरप्लेट नसेल तुमच्या गाडीला तर लवकरात लवकर लावून घ्यावेत…

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे. वाहनांना नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणा-या वाहनांची ओळख पटविणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, नंबरप्लेटच्या बुकिंगसाठी https://mhhsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉईंटमेंट घेऊन नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे अवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पैसे किती लागले?

दुचाकी आणि ट्रॅक्टर – ४५० रुपये, यात GST वेगळी लागेल. तीनचाकी – ५०० रुपये, GST वेगळी लागेल. हलकी मोटार वाहने, प्रवासी कार,मध्यम व्यावसायिक वाहने,अवजड व्यावसायिक वाहने आणि ट्रेलर – ७४५ रुपये, GST वेगळी लागेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!