पुण्यातील गणेशभक्तांसाठी महत्वाची बातमी! गणेश विसर्जन वेळापत्रकात मोठा बदल? जाणून घ्या..


पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत बाळासाहेब ठाकरे कलादालनात झालेल्या बैठकीत ७० हून अधिक गणेश मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये काही विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये यंदा मिरवणुकीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अनेक गणेश मंडळांनी मानाच्या पाच गणपतींपूर्वी मिरवणुकीत सहभागी होण्याची मागणी केली आहे.

यामध्ये प्रत्येक मंडळासाठी स्वतंत्र ढोलताशा पथक न ठेवता एकच पथक दिलं जावं, अशीही सूचना बैठकीत मांडण्यात आली आहे. मानाच्या गणपतींपूर्वीच आम्हाला मिरवणुकीत सहभागी होऊ द्या, अन्यथा आम्हीच सकाळी ७ पासून मिरवणूक सुरु करू, असे या बैठकीत काही मंडळांनी स्पष्टपणे सांगितले आहे. यामुळे अंतिम निर्णय लवकरच होणार आहे.

सध्या लक्ष्मी रस्त्यावर 300 पेक्षा अधिक मंडळं सहभागी होतात. त्यामुळे वाहतूक, पोलीस बंदोबस्त आणि आरोग्यदृष्ट्या नियोजन अत्यंत गरजेचे आहे. यावर्षी वेळेचं काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध मिरवणुकीवर भर दिला जाणार आहे. अनेकदा नियोजन नसल्याने अनेक लोकांना आणि मंडळांना त्रास सहन करावा लागतो.

त्यांचे म्हणणे आहे की, दरवर्षी आमच्यावर अन्याय होतो. मिरवणुकीचा वेळ रात्री उशिरापर्यंत लांबतो. त्यामुळे वेळेच्या बंधनामुळे आमच्या भक्तगणांना आणि कलाकारांना त्रास सहन करावा लागतो. पारंपरिक पद्धतीनुसार, विसर्जन मिरवणूक सकाळी १० वाजता सुरु होते आणि मानाच्या गणपतींपासून सुरुवात होते. मात्र, इतर अनेक मंडळांचा विसर्जन क्रमांक संध्याकाळपर्यंत लागतो.

त्यामुळे अनेक मंडळांना विसर्जन दुसऱ्या दिवशीपर्यंत लांबण्याचा अनुभव येतो. याविरोधात काही मंडळांनी आता उघड भूमिका घेतली आहे. तसेच प्रत्येक मंडळासाठी स्वतंत्र ढोल पथक ठेवण्याऐवजी एकच पथक वापरण्याची व्यवस्था करावी. यामुळे विसर्जन मिरवणूक अधिक वेगात पार पडेल आणि अडचणी टळतील, असेही अनेकांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!