शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता ‘इतकाच ‘असणार ; कृषिमंत्र्यांची लोकसभेत माहिती

पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही देशभरातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार आहे.2019 च्या फेब्रुवारीत सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत वीस हत्यांद्वारे 3.9 लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. गेल्या काही दिवसापासून या योजनेचा हप्ता वाढवला जाणार असलेल्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याची अशी कोणतीही योजना सध्या तरी सरकार दरबारी विचाराधीन नाही. यावरून पीएम किसानच्या लाभार्थ्यांना पुढील 21 वा हप्ता नेहमीप्रमाणे दोन हजार रुपयांचाच मिळणार असे स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये पीएम किसानचा हप्ता वाढेल अशा चर्चा सुरू आहेत आणि यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दरम्यान आता याच संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत मोठी माहिती दिली आहे.
पीएम किसान योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. ही योजना संपूर्ण देशात सुरू आहे. या योजनेची लाभार्थी संख्या जवळपास साडेनऊ कोटी इतकी आहे. या योजनेतून वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो.दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते. मात्र या हप्त्यामध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याच त्यांनी स्पष्ट केल आहे.
दरम्यान पीएम किसानचा विसावा हप्ता लांबणीवर पडला होता. मात्र पुढील 21 वा हप्ता वेळेवर येण्याची शक्यता आहे. त्यानुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये पीएम किसानचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
