हडपसर टर्मिनलबाबत महत्वाची माहिती, सध्या रेल्वेगाड्यांचे स्थलांतर नाही, प्रशासनाची माहिती…


पुणे : हडपसर टर्मिनल संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. हडपसर टर्मिनल येथून सध्या साप्ताहिक उन्हाळी विशेष पाच गाड्या सुरू आहेत. येथील इन्फ्रास्ट्रक्चरची कामे वेगाने सुरू आहेत. सर्क्युलेटिंग एरियासह अनेक विकासकामे बाकी आहेत.

ती पूर्ण झाल्यानंतरच पुणे रेल्वेस्थानकावरील गाड्या हडपसर टर्मिनल येथे स्थलांतर करण्याबाबत निर्णय घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर ठरवले जाईल. सध्या रेल्वेगाड्या स्थलांतरणाचे काही नियोजन नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुणे रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रवाशांची आणि रेल्वेगाड्यांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.

त्यामुळे वाढलेला ताण कमी करण्यासाठी नुकतेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे परिसरातील चार स्थानकांच्या विकासाची कामे सुरू केल्याचे सांगितले. मात्र, या स्थानकांच्या विकासाची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत, अशातच रेल्वे प्रशासन पुणे रेल्वेस्थानकावरील गाड्या स्थलांतर करण्याचे नियोजन करत आहे. याबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, कोणतीही पायाभूत सुविधा नसताना रेल्वेने असे करू नये, अशी मागणी रेल्वेप्रवाशांकडून केली जात आहे.

हडपसर टर्मिनलवर सध्या रेल्वेप्रवाशांसाठी म्हणाव्या तशा पायाभूत सुविधा कोणत्याही उपलब्ध नाहीत. तेथून गाड्या सुरू करण्याचे नियोजन रेल्वे कसे काय करत आहे? प्रवाशांना दोन-दोन किलोमीटरपर्यंत बॅगा घेऊन पायपीट करावी लागत आहे, तर रिक्षावाले अवाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट करत आहेत.

आतमध्ये पीएमपीच्या बस जातील असा रस्ताच नाही. मग कसे काय रेल्वे नियोजन करणार आहे? रेल्वे प्रशासनाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अगोदर येथे पायाभूत सुविधा पुरवाव्यात अन् मग सेवा सुरू करण्याचा विचार करावा. तसेच, कामे अर्धवट असताना सात-सात गाड्या कशा काय सुरू करताहेत? यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. त्यावर तत्काळ कार्यवाही करावी.

आनंद सप्तर्षी, सदस्य, विभागीय सल्लागार समिती, मध्य रेल्वे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!