पिंपरी चिंचवडसाठी महत्वाची माहिती ; खड्ड्यामुळे अपघात झाला तर थेट अधिकारी अन कंत्राटदारांच्या खिशातून पैसे….


पुणे : पिंपरी शहरात खड्ड्यांमुळे अपघात होणे ही दरवेळीची गंभीर समस्या बनली आहे. शहरातील खड्ड्यामुळे अपघात झाल्यास दुखापतीची सर्व रक्कम कंत्राटदार किंवा अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल केली जावी असा आदेशाचा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशामुळे आता कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना मोठा दणका बसणार आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार नुकसानभरपाई कंत्राटदाराच्या बिलातून किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल केली जावी असा स्पष्ट इशारा देखील न्यायालयाने दिला आहे.न्यायालयाने हे आदेश सुनावणीदरम्यान दिले, ज्यात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांनी राज्य सरकारला सूचना दिल्या की मृत आणि जखमींच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी तात्काळ धोरण तयार करावे. न्यायालयाच्या या आदेशामुळे महापालिकेच्या स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांमध्ये काळजी आणि धाकधूक वाढली आहे. कारण आता त्यांच्या कामातील चुकांमुळे होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी अधिक स्पष्ट झाली आहे.

आता न्यायालयाच्या आदेशानंतर या कुटुंबांना नुकसानभरपाई मिळेल का हे पाहणे महत्वाचे ठरले आहे. या निर्णयामुळे भविष्यात अपघात घडल्यास, जखमी आणि मृतकांच्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत मिळण्याची शक्यता वाढली आहे. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये आपले काम नीट करावे लागेल अशी जबाबदारी निर्माण झाली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!