शासकीय निकषांतील आजारपण क्रिमपोस्टींगने होणार बरे! जिल्हास्तरीय कर्मचारी बदल्यांत दृष्टीहीन, कर्णबधीर, अपंग, दुर्दर आजार सवलतीत क्रीमपोस्टची डिमांड…


जयदिप जाधव

उरुळीकांचन : समुपदेशनानुसार बदली प्रक्रिया पुणे जिल्ह्यात पार पडत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हया निर्णयांचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र अपंग, दृष्टीहीन, रक्तदाब, स्थूलपणा, दुर्जर आजार, मेडीकल इमर्जंसी, पती पत्नी एकत्रीकरण कायदा या आयुधांचा वापर करत कर्मचाऱ्यांनी जिह्यातील महत्वाचा ठिकाणी क्रिम पोस्टींगची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांचे हे आजारपण शासनाला दिशाभूल करणारे आहे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासकीय निकष व आयुधांचा वापर करणा-या कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध आस्थापनेवर त्यांना तैनात केल्यास समुपदेशन बदली प्रक्रिया पारदर्शक ठरणार असल्याचा एक मतप्रवाह महसूल विभागातून व्यक्त होत आहे. कारण ग्राम महसूल अधिकारी,मंडल अधिकारी या पोस्टवर असणा-या कर्मचाऱ्यांना चोवीस तास अलर्ट रहावे लागते. पंचनामा, नैसर्गिक आपत्ती, प्रोटोकॉल यामध्ये सेवा बजावताना दुर्धर आजार, अपंगत्व कर्मचा-यांना शक्य होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाला याची नोंद घेणे आवश्यक आहे.

राज्य शासनाने शासकीय सेवेतील तृतीय श्रेणी संवर्गातील बदल्यांच्या धोरणात समुपदेशन तत्वानुसार बदल्यांचे धोरण जाहीर केल्याने पुणे जिल्ह्यात २७३ महसूल पदांसाठी आज समुपदेशन बदल्यांची प्रक्रिया पार पडत आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच डिजीटल डिस्प्लेद्वारे एकूण पद व सेवाज्येष्ठतेनुसार बदल्यांचे सूत्र जिल्ह्यात राबविणार असल्याचे सूचित केल्यानंतर आज समुपदेशन द्वारे बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मात्र शासन निकषानुसार या बदल्यांत अंधत्व, अपंगत्व, विकलांग, तत्सम आजार, पती -पत्नी एकत्रीकरण तसेच कुटूंबातील सदस्यांना तत्सम आजार असल्याचा कारणांनी या बदल्यांना मागणीनुसार प्राधान्य द्यावे या सुत्रानूसार बदली करण्याचे धोरण ठरल्याने या निर्णया आड जाऊन आता या शासकीय कर्मचाऱ्यांनी जिह्यातील महत्वाचा ठिकाणी क्रिम पोस्टींगची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांचे हे आजारपण शासनाला दिशाभूल करणारे आहे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील ९ उपविभागीय अधिकारी (प्रांत) तसेच १७ तहसिल व जिल्हाधिकारी अस्थापनांतील बदलीस पात्र असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा आज बदल्या पार पडत आहे. या बदल्यांपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या विवरणपत्रात निकषात बसणाऱ्या पदांसाठी माहिती माघविण्यात आली आहे. या विवरणपत्रात महसूल कर्मचाऱ्यांनी फिटनेसपणाचे कारण दाखवून आपली बदली या क्रिमपोस्ट अस्थापनांंत व्हावी म्हणून नामी शक्कल लढविली आहे.

काही कर्मचाऱ्यांनी शासकीय निकषाचा फायदा घेत आपण दृष्टीहीन,अपंगत्व , कर्णबधीर स्थूलपणा , रक्तदाब, दुर्जर आजार असल्याचे कारणे दाखवून पसंतीक्रमानुसार बदल्यांची मागणी केली आहे.त्यामुळे या कर्मचाऱ्यांचाहे सर्व विकार या क्रिमपोस्ट मिळाल्याने दूर होणार आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!