कॉक्रोच जनता पार्टी वादात आता आयबीची एन्ट्री?; ट्विटर अकाउंट बंद झाल्यानंतर बड्या नेत्याचा गंभीर दावा, राजकीय वर्तुळात खळबळ!


नवी दिल्ली : सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुणाईची तुलना झुरळांशी केल्याच्या वक्तव्यावरून देशभरात चर्चा रंगली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ मराठी तरुण अभिजीत दिपके यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची स्थापना केली असून, सोशल मीडियावर या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

काही दिवसांतच या पक्षाच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाल्यानंतर ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे भारतातील ट्विटर अकाउंट अचानक बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

काँग्रेस नेते Nana Patole यांनी याप्रकरणी गंभीर आरोप करत मोठा दावा केला आहे. “कॉक्रोच जनता पार्टीचे ट्विटर अकाउंट बंद होण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा हात असू शकतो,” असा आरोप त्यांनी केला आहे.

पटोले म्हणाले, “आयबीकडून केंद्र सरकारला संभाव्य जनआक्रोशाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतरच हे अकाउंट ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला गेला,” असा दावा त्यांनी केला. तसेच, “फक्त सोशल मीडिया अकाउंट बंद करून तरुणांच्या मनातील संताप थांबणार नाही,” असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला. “चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे भारताचा पारंपरिक मित्र असलेला इराण दूर गेला आणि त्याचा परिणाम देशातील इंधन परिस्थितीवर झाला,” असा आरोपही पटोले यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!