तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, आम्ही ब्राम्हणांची ताकद दाखवून घरात घुसून मारू!! इंद्रजीत सावंतांना थेट धमकी, नेमकं कोणी दिली धमकी?


मुंबई : इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना सावंत हे ब्राह्मण समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत घरात घुसून मारण्याची धमकी एका व्यक्तीने दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्यांनी छावा चित्रपटातील प्रसंग व इतिहासातील वास्तव यावर मत मांडले होते.

त्यांनी विविध वृत्तवाहिन्यांशी बोलताना भूमिका मांडल्यानंतर हा प्रकार घडला आहे. या संदर्भातील माहिती इंद्रजीत सावंत यांनीच प्रसारमाध्यमांना दिली आहे. इंद्रजीत सावंत यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी घडलेला प्रकार सांगितला आहे.

तसेच त्यांनी या संदर्भातील कॉल रेकॉर्डिंग देखील त्यांनी प्रसारित केले आहे. यामध्ये प्रशांत कोरटकर असे हा व्यक्ती नाव सांगत असून जिथे असाल, तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू. घरात घुसून मारू असे म्हणत या व्यक्तीने अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केल्याचे इंद्रजीत सावंत यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

याबाबत कारवाईची मागणी केली जात आहे. या व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत देखील अवमानकारक वक्तव्य या व्यक्तीने केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. यामुळे पोलिसांनी याबाबत तपास करत कारवाईची मागणी केली आहे. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सावंत हे आपलं मतं मांडत आहेत.

तसेच वेगवेगळ्या माध्यमांवर इतिहासाविषयीची भूमिका स्पष्ट करत आहेत. इतिहासात घडलेल्या गोष्टींची दाखले देत आहेत. दरम्यान, त्यांचे हे दावे ब्राह्मणांच्या विरोधात असल्याचा आरोप संबंधित व्यक्तींनी केला आहे. यामुळे हा व्यक्ती कोण आहे याचा शोध घेतला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!