मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले; धनंजय मुंडे भाग्यवान कारण…परळीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत


परळी : माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या बालपणीच्या स्वप्नांचा उलगडा केला. जीवनात प्रत्येकाला हवे तेच क्षेत्र मिळते असे नाही, असे म्हणल्या आहेत. तसेच त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या करिअर निवडीवरही भाष्य केले.

परळी येथे आयोजित एका स्नेहसंमेलनात बोलताना त्यांनी आमदार धनंजय मुंडे यांनीही मराठमोळ्या पाहुणचारावर आपल्या खास शैलीत फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली.

काय म्हणल्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे यांना शिक्षणादरम्यान डॉक्टर होण्याची तीव्र इच्छा होती, पण कमी मार्क्स पडल्यामुळे त्यांना या क्षेत्रात प्रवेश घेता आला नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना वकील व्हायचे असताना त्या डॉक्टर झाल्या, तर येसू मुंडे यांनी वकिलीचे क्षेत्र निवडले.

धनु भाऊ मात्र भाग्यवान आहेत, त्यांना राजकारणी व्हायचं होतं आणि ते राजकारणातच आले. असंच होतं ज्याला जे व्हायचं असतं ते होता येत नाही. असं म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉक्टर होण्याच्या आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाबद्दल जाहीर कार्यक्रमात मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, आपल्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, त्यांचा त्यांच्या व्यवसायाशी फारसा तांत्रिक संबंध नाही. त्या एक मोठी डिस्टिलरी चालवत असल्या तरी, त्यांना तिथल्या ब्रँड्सबद्दल किंवा कामकाजाबद्दल फारशी माहिती नसते. त्यांच्या या प्रांजळ कबुलीमुळे सभागृहात एकच हशा पिकला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!