मी श्रेयसच्या दोन मुलांची आई…अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य, लग्नाबद्दल काय बोलून गेली?


मुंबई : बिग बॉस १८ मधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री ईडन रोज हिने नुकत्याच एका मुलाखतीत भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. मी अय्यरच्या दोन मुलांची आई आहे, असे विधान करत तिने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे.

ईडन रोज ही अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण न केलेली अभिनेत्री आहे, पण ती अनेक इव्हेंट्समध्ये आणि सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिला इन्स्टाग्रामवर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती आपले फोटोज, व्हिडिओज शेअर करत सतत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

ईडनने मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की, “ती अय्यरच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली आहे” आणि त्याला मनोमन आपला पती मानते. तिच्या मते, श्रेयस अय्यर हा खऱ्या अर्थाने आदर्श जोडीदार आहे आणि मी मनातून त्याच्याशी लग्नही केलं आहे.” इतकंच नाही, तर ती पुढे म्हणते, “मी त्याच्या दोन मुलांची आईदेखील आहे.

दरम्यान, हे वक्तव्य काल्पनिक असलं तरी, तिच्या भावना आणि आत्मविश्वासामुळे चर्चेला उधाण आलं आहे. सोशल मीडियावर तिचे हे वक्तव्य व्हायरल होत असून, यावर श्रेयस अय्यरची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!