पुस्तकात माझा उल्लेख देखणा अन् चिकना, माझ्या बायकोला पण सांगा!! पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अजित पवार यांची जोरदार फटकेबाजी…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वेगळ्या अंदाजसाठी प्रसिद्ध आहेत. कधी ते काय बोलतील कधी कोणाला खडे बोल सुनावतील सांगता येत नाही. अजित पवारांच्या हस्ते धडपड भाग 3 या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी देखील त्यांनी असेच वक्तव्य केले आहे.

पुण्यात या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पजला. या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी उपस्थितांशी मिश्कील संवाद साधला. यामुळे उपस्थित कार्यक्रमात एकच हशा पिकला. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार म्हणाले, मी पुस्तकाचे प्रकाशन केलं की पुस्तक जास्त विकलं जाते का? असा सवाल करत मला रॉयलटी पाहिजे, असं विनोदी भाष्य अजित पवारांनी पुण्यात केलं. यावर उपस्थितांनी हसून दाद दिली. धडपड भाग 3 या पुस्तकात माझा उल्लेख देखणा, चिकना असा केलाय, असं अजित पवार म्हणाले.

तसेच ते म्हणाले, मला देवेंद्र फडणवीस सांगत होते त्यांनी राजकारणात येण्याआधी मॉडेलिंग केलेय. मी जर एवढा देखणा चिकना आहे तर माझ्या बायकोला पण सांगा की, ती मला कधीच म्हणाली नाही, असं अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले. यामुळे देखील मोठा हशा झाला.

दरम्यान, अजित पवार यांचा कार्यक्रम म्हणजे कार्यकर्त्यांना पर्वणी असते. कधी ते कामावरून बोलतात, तर कधी ते कोणाची फिरकी घेतील सांगता येत नाही. पुण्यातील कार्यक्रमात अजित पवार यांनी असाच हशा केल्याने हा कार्यक्रम एकदम हलका फुलका झाला.