नवऱ्याचा अनैसर्गिक शरीरसंबंध तर सासऱ्यानेही केला बलात्कार, बारामतीत नात्याला काळीमा फासणारी घटना…

बारामती : एका २५ वर्षीय महिलेने बारामती पोलिसांकडे तिच्या पती आणि सासरच्या मंडळींवर छळ आणि बलात्कार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी पाच जणाविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, या महिलेचे माहेर नगर जिल्ह्यात आहे. तिच्या वडिलांना कर्करोग आहे. मात्र तरीदेखील सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा छळ करत होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित वागवल्यानंतर तिचा छळ सुरू झाला. ती गर्भवती राहिल्यानंतर देखील तिला गर्भपातासाठी आग्रह धरला जात होता.
दरम्यान जळोची येथील मनोज विष्णू सांगळे, विष्णू सांगळे, नंदा सांगळे, पूजा वणवे आणि प्रियंका वणवे या पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब अशी की, या घटनेत नवऱ्याने बायकोला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि सासऱ्याने बलात्काराची घटना केल्याने या महिलेने माहेर गाठले.
दरम्यान. तेथे अहिल्यानगर पोलिसांकडे भरोसा सेलमध्ये तक्रारी अर्ज दिला. तेथील समुपदेशनासाठी सासरचे लोक एकदाच आले, मात्र त्यानंतर आलेच नाहीत. त्यामुळे या महिलेने नाईलाजाने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान या महिलेने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.