कोरेगावमूळला पत्नीच्या सततच्या त्रासाने पतीने जीवन संपविले! पतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीला अटक…


उरूळी कांचन : पत्नीने दिलेल्या त्रासापासून पतीनेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कोरेगावमूळ (ता.हवेली) घडली आहे. या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. सुरज दामोदर पवार (वय 32 रा. जेधे चाळ, इनामदारवस्ती, कोरेगावमूळ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी त्याची पत्नी मयुरी सुरज पवार उर्फ मयुरी अनिल जाधव (वय -२६, रा.जेधे चाळ, इनामदार वस्ती , कोरेगावमूळ, चालू पत्ता सोरतापवाडी, ता.हवेली ) असे आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी तरुणाचे वडील दामोदर निवृत्ती पवार (वय -६० ) यांनी उरुळीकांचन पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी मयुरी हीने दिलेला मानसिक त्रासामुळे तसेच सुरज यास केलेल्या मारहाणीमुळे त्याने आपल्या मोबाईलमध्ये संभाषण करुन आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या मृत्यूस पत्नी जबाबदार आहे असे म्हणत आत्महत्या केली आहे.

प्रथमदर्शनी रस्सी व साडीने घराच्या बेडरूममध्ये गळफास घेवुन सूरजने आत्महत्या केली आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलिसांनी पत्नी मयूरीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षण सई मटाले या करीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!