गावच्या सरपंचाला किती पगार मिळतो? ९९ टक्के लोकांना माहितीच नसेल!

पुणे : राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून नवनिर्वाचित सरपंचांच्या अधिकारांबरोबरच त्यांच्या मानधनाचीही चर्चा सुरू झाली आहे. गावाची धुरा सांभाळणाऱ्या सरपंचांना नेमके किती मानधन मिळते, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

ग्रामपंचायतीच्या सरपंचांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ठराविक पगार नसून दरमहा मानधन दिले जाते. महाराष्ट्र शासनाने २०२४ मध्ये या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मानधन गावाच्या लोकसंख्येवर आधारित असते. २,००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंचांना ६,००० रुपये मानधन मिळते. २,००१ ते ८,००० लोकसंख्या असलेल्या गावात ८,००० रुपये तर ८,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात १०,००० रुपये दरमहा मानधन दिले जाते.

उपसरपंचांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. २,००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावात २,००० रुपये, २,००१ ते ८,००० लोकसंख्या असलेल्या गावात ३,००० रुपये आणि ८,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात ४,००० रुपये मानधन दिले जाते.

सरपंच हे गावाच्या विकासाचे मुख्य केंद्र असतात. बैठका घेणे, विकासकामांची अंमलबजावणी करणे आणि शासकीय योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असते. त्यांना अधिकृत कामांसाठी प्रवास भत्ता, कार्यालयीन सुविधा तसेच शासकीय प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही दिले जाते.