दिशाच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचा कसा झाला अंत?, चहा प्यायला थांबला, ‘फोन ट्रेस होऊ नये म्हणून ऑनलाईन पेमेंट केलं नाही’ पण..


मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. गाझियाबादच्या टेक्नो सिटीमध्ये झालेल्या चकमकीत दोघांनाही ठार करण्यात आलं आहे.

ही चकमक यूपी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि दिल्ली-हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत घडली आहे. रवींद्र हा रोहतकचा रहिवासी होता आणि अरुण हा सोनीपतचा रहिवासी होता. दोघेही गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा टोळीचे सक्रिय सदस्य होते. घटनास्थळावरून एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

सीएम योगी आदित्यनाथ यांनी देखील तत्काळ कारवाईचे निर्देश दिले होते. शूटर्सची ओळख रोहतकचा रविंद्र आणि सोनीपतचा अरुण अशी झाली होती. दोघे रोहित गोदारा-गोल्डी बरार टोळीचे सक्रिय सदस्य होते.

एक लाख रुपयांचे बक्षीस असलेला गुन्हेगार रवींद्र, त्याचा गुन्हेगारी इतिहास होता आणि तो यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये सहभागी होता. पण तो घाबरला नाही. या प्रकरणाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्नही केला नाही. तो सगळीकडे उघडपणे फिरत होता आणि याच धाडसामुळे त्याला अटक झाली.

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे हे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी वाचण्यासाठी अनेक रस्ते बदलत होते. त्यांनी आपल्या फोनचा वापर कधीच केला नाही. एकाने हेल्मेट घालून आपला चेहरा लपवला होता तर दुसरा शूटर बेधडकपणे वावरला. त्याने आपला चेहरा लपवला नाही.

गोळाबारानंतर रविंद्र एका चहाच्या दुकानात चहा प्यायला तांबला. तो तिथे दवळपास २२ मिनिटे थांबला. दुकानदारा ऑनलाईन पेमेंट केली नाही, जेणेकरून त्याचा फोन ट्रेस होऊ नये.. त्याने रोख पैसे दुकानदाराला दिले. रविंद्रचा चेहराच नाही तर त्याच्या लाल रंगाच्या (एका ब्रँडचे शूज) बुटांच्या मदतीने पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आले.

रामपूरमध्ये थांबले आरोपी..

गोळीबारा आधी ११ सप्टेंबर रोजी दोघे रामपूरमध्ये एका हॉटेलमध्ये थांबले होते. येथे शूटरची पहिली टीम नकुल आणि विजयला भेटले. माहिती दिला आणि मग निघून गेले. अरुण-रविंद्र हॉटेलमध्ये जेवले, आराम केला. मग रात्री १२ वाजता निघाले. रात्री उशीरा दिशाच्या घराबाहेर गोळीबार केला.

दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी एसटीएफ आणि दिल्लीच्या स्पेशल टीमने सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला. दिल्लीच्या मार्गाने गाजियाबाद कडे जाताना त्यांचा पिच्छा केला. सी टेन पोलिस ठाण्यापासून चारशे मीटर अंतरावर पोलिसांच्या गाडीने आरोपींना घेराव घातला.

दरम्यान, दोघांनी गोळीबार करायला सुरुवात केली. जवळपास १० राऊंड गोळीबार केली. यामध्ये एक जवान देखील जखमी झाला. चकमकीत दोघे गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांनी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!