भयंकर! एअरबॅगनेच केला घात, कारमध्ये 25 वर्षीय तरुणांचा धक्कादायक मृत्यू, नेमकं काय घडलं?

मुंबई : कारमध्ये एअरबॅग असणे खूप गरजेचे आहे. अनेकदा अपघात झाल्यावर एअरबॅगमुळे अनेकांचे जीव वाचलेले आपण बघितले आहेत. ही सुरक्षिततेसाठी दिलेली असते. कारचालकासह कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एअरबॅग दिली जाते.

सध्या साध्या कारपासून ते आलिशान, महागड्या प्रत्येक कारमध्ये एअरबॅग असते. यामुळे प्रवास सुरक्षित होतो. असे असताना आता मिरा-भाईंदरच्या प्लेजंट पार्क परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जी एअरबॅग प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असते, ती अचानक उघडल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली.
मोहित सोनी (२५) असे या तरुणाने नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गाडी चालवताना गाडीतील एअरबॅग अनपेक्षितपणे उघडली. या घटनेत मोहित सोनी यांच्या मानेला मोठी दुखापत झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत असून याची चर्चा सुरू झाली आहे. मोहित सोनी यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय? गाडीतील एअरबॅग नेमकी कशामुळे उघडली? या घटनेला अन्य कोणती तांत्रिक कारणे आहेत का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, वैद्यकीय अहवाल, तांत्रिक तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील चौकशी करण्यात येत असून, अधिक तपशीलवार माहितीची प्रतीक्षा आहे. याबाबत गाडी कंपनीची देखील चर्चा केली जात असून तपासानंतर अधिकची माहिती समोर येणार आहे.