शिंदवणे येथे भीषण अपघात! भाविकांना घेऊन जाणारे पिकअप झाले पलटी, अनेकजण गंभीर जखमी….

उरुळी कांचन : उरुळी कांचन-जेजुरी मार्गावरील शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आंब्याचा मळा परिसरातील वळणावर एक पिकअप पलटी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी (ता. १५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत ३ जण गंभीर जखमी आहेत.
तसेच ६ जणांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. अशीच ही एक अपघाताची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर जखमींना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही पिकअप जेजुरी बाजूकडून उरुळी कांचनकडे निघाली होती. शिंदवणे हद्दीतील आंब्याचा मळा या ठिकाणी असलेल्या वळणावर पिकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व पिकअप रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाले. यावेळी उपस्थित जखमींच्या मदतीला आहे.
जखमींना उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून जखमींची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.