उरुळी कांचनमध्ये भरधाव स्कुटरचा भीषण अपघात; प्रवासी ठार, चालकावर गुन्हा दाखल….


उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथील विश्व पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात चालविण्यात आलेल्या स्कुटरचा भीषण अपघात होऊन एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १७ जानेवारी रोजी दुपारी घडली. या प्रकरणी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात स्कुटर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची संतोष लक्ष्मण झोंबाडे (वय ३५, रा. झोंबाडेवस्ती, बायफ रोड, उरुळीकांचन) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी आकाश दिनेशकुमार राणा (वय २१, व्यवसाय मजुरी, सध्या रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे; मूळ रा. सिरोही, राजस्थान) याने सुझुकी एक्सेस स्कुटर भरधाव वेगात व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून चालविल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादी नमूद आहे.

पुण्याकडून सोलापूरकडे जात असताना स्कुटरवरील मागे बसलेला नंदुकुमार बहरैची (वय ५५, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे; मूळ रा. उत्तर प्रदेश) जोरात हलल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे स्कुटर घसरून अपघात झाला. या अपघातात नंदुकुमार यांच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापती झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात स्कुटरचेही नुकसान झाले आहे.

या घटनेची नोंद १७ जानेवारी रोजी रात्री ८.३५ वाजता उरुळीकांचन पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार भोसले पुढील तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!