पिंपरी चिंचवडमध्ये भयंकर अपघात ; भरधाव कारने सफाई कर्मचाऱ्याला चिरडलं; जागीच मृत्यू


पुणे : पिंपरी- चिंचवडमध्ये भरधाव कारने सफाई कर्मचाऱ्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी -चिंचवड शहरातील वाकड परिसरातील एम्पायर गार्डनसमोर हा अपघात झाला.मुकेश कोंडीराम रणपिसे असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. बेधडकपणे कार चालवणाऱ्या चालकाने सफाई कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.पोलिस सध्या तपास करत आहेत.

मुकेश रणपिसे हा पिंपरी- चिंचवड महापालिकेत कायमस्वरुपी सफाई कामगार म्हणून घंटागाडीवर कार्यरत होता. या प्रकरणात वाकड पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. या कार चालकाविरोधा वाकड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!