भयंकर! महिलेने १४ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट दातांनी चावला, आणि मग जे घडले ते हादरवणारं होतं…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गावात झालेल्या किरकोळ भांडणात एका महिलेने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि एका १४ वर्षांच्या मुलाचे प्रायव्हेट पार्ट दातांनी चावल्याचे समोर आले आहे.
या अनपेक्षित आणि क्रूरतेमुळे १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा वेदनेने ओरडला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, मुलाचे नशीब चांगले होते की, त्याने जाड पँट घातली होती, त्यामुळे त्याला कोणतीही गंभीर अंतर्गत दुखापत झाली नाही आणि मोठा अपघात टळला
ही धक्कादायक घटना सामान्य भांडणादरम्यान घडली. पीडित मुलाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्याचा गावातील एका महिलेशी कशावरून तरी वाद झाला होता. काही वेळातच प्रकरण इतके वाढले की, महिलेचा राग सुटला आणि तिने मुलाला घट्ट पकडले. तिने पुढे जे केले ते सर्वांना धक्का देण्याइतके होते.
त्या महिलेने मुलाचे गुप्तांग दातांनी चावला. त्यानंतर मुलगा असह्य वेदनाने तडफडू लागला आणि त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक जमा झाले. त्यानंतर जमलेल्या नागरिकांनी कसे तरी त्या महिलेच्या तावडीतून मुलाला सोडवले.
मुलाची गंभीर प्रकृती पाहून कुटुंबीय खूप काळजीत पडले आणि त्यांनी त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले. प्रथमोपचार दिल्यानंतर डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि सांगितले की मुलाचे नशीब होते की त्याने जाड पँट घातली होती, ज्यामुळे चावल्यानंतरही त्याला कोणतीही गंभीर अंतर्गत दुखापत झाली नाही. डॉक्टरांच्या मते, अल्पवयीन मुलगा आता धोक्याबाहेर आहे आणि औषधांच्या मदतीने हळूहळू बरे होईल.
सध्या अल्पवयीन मुलगा धोक्याबाहेर आहे. पण या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबात आणि संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.