शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात ऐतिहासिक घोषणा!! 4 टक्के व्याज आणि 3 लाखांचे कर्ज, जाणून घ्या…

नवी दिल्ली : केंद्राचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. यातच शेतकऱ्यांसाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सभागृहात सादर केला.

या अहवालात त्यांच्याद्वारे विविध महत्त्वाच्या योजनांचा उल्लेख केला गेला आहे. यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे सुधारित व्याज अनुदान योजना ही आहे. असून ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सध्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज मिळत आहे. 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 7 टक्के व्याज दर लागू होतो. जर शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली, तर 3 टक्के सबसिडी मिळवून त्यांचा व्याज दर 4 टक्क्यांपर्यंत कमी होतो. यामुळे योजना फायदेशीर आहे.

या योजनेचा फायदा लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत आहे. तसेच हे कर्ज शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
दरम्यान, या योजनेतून येणाऱ्या आर्थिक वर्षापासून दावे आणि आवश्यक बाबी जलदपणे पूर्ण करण्यासाठी किसान कर्ज पोर्टल वापरण्यात येणार आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दावे निकाली काढले गेले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.