रांजणगाव गणपती येथील भूखंड लाटल्याप्रकरणी पाचुंदकरांना हायकोर्टाचा दणका : तत्कालीन महसूल मंत्र्यांचा आदेश कायम


शिरूर : रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील गावठाणातील ७२ गुंठ्यांच्या भूखंडाचे श्रीखंड लाटल्याप्रकरणी तत्कालीन महसूल मंत्र्यांनी दिलेला आदेश कायम ठेवत मुंबई हायकोर्टाने आनंदराव दिनकर पाचुंदकर यांचे अपील फेटाळले असून, रांजणगाव गणपती देवस्थानच्या अध्यक्षा व माजी जि.प.सदस्या स्वाती दत्तात्रय पाचुंदकर यांचे सासरे आनंदराव दिनकर पाचुंदकर यांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे.

सध्याच्या बाजारभावाप्रमाणे रांजणगाव गणपती येथील ७२ गुंठे जमीन हडपल्याचे प्रकरण हे सुमारे कोट्यावधी रुपयांचे आहे. असा दावाही विद्यमान सरपंच व उपसरपंच यांनी केला आहे. ग्रामपंचायतीचे सन १९६०-६१ चे रेकॉर्ड भिजल्याचा गैरफायदा घेऊन, संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांना हाताशी धरून राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर यांनी बनावट रेकॉर्ड बनवले.

यामध्ये ८अ मध्ये खाडाखोड व पाने चिकटून आनंदराव पाचुंदकर यांचे सन १९६०-६१ मध्ये वय-१२ वर्ष असताना गावठाणातील सुमारे ७२ गुंठे मिळकतीवर सिटी सर्वे मार्फत आनंदराव पाचुंदकर यांचे नाव नोंदवले. दरम्यान सन-२०१९ ला ग्रामपंचायतीची सत्ता पाचुंदकर विरोधी गटाच्या ताब्यात आली त्यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सर्जेराव खेडकर होते.पाचुंदकर विरोधी गटाकडे ग्रामपंचायतीची सत्ता आल्यानंतर गाव नमुना आठमध्ये खाडाखोड करून जमीन बळकविण्याचा केलेला प्रकार सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आला.

त्यानंतर महाराष्ट्र शासनाची हडपलेली जमीन वाचविण्यासाठी पाचुंदकर विरोधी गटाने तत्कालीन महसूलमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्यावेळी महसूलमंत्र्यांसमोर झालेल्या सुनावणीनंतर त्यांनी संबंधित मिळकतीतून आनंदराव पाचुंदकर यांचे नाव वगळून शासनाचे नाव दाखल करण्याचा आदेश दिला होता.

त्यामुळे संबंधित आदेशाच्या विरोधात आनंदराव दिनकर पाचुंदकर यांनी दाद मागण्यासाठी हायकोर्टात अपील केले होते. ते अपील हायकोर्टाने बुधवारी १९ मार्च रोजी फेटाळले आहे अशी माहिती. सरपंच सुवर्णा वायदंडे व उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर यांनी दिली.

असे असताना मात्र, सन २०१४ ते २०१७ दरम्यान आनंदराव पाचुंदकर यांच्या स्नूषा स्वाती दत्तात्रय पाचुंदकर ह्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या सरपंच व नंतर जि. प.सदस्या झाल्या. त्यांच्याकडून आणि सन २००८ ते २००९ पासून संबंधित प्रकरणाशी संबंधित सर्वच पदाधिकारी व अधिकारी हे कायदेशीररित्या दोषी आढळले आहेत.

त्यामुळे तत्कालीन सर्वांकडूनच पदाचा गैरवापर करण्यात आला असा आरोपही पाचुंदकर विरोधी गटाकडून करण्यात आला आहे. तत्कालीन संबंधित सर्वच पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी पाचुंदकर विरोधी गटाने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!