जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, शेतात झोपले अन् सकाळी घडलं आक्रीत, आंदोलकाचा दुर्दैवी अंत…


जालना : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकाचा अंतरवाली सराटीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सध्या तपास सुरू आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

दशरथ रायकर असे त्यांचे नाव आहे. रात्री उशिरा ते आंतरवाली येथील एका शेतात झोपले होते, मात्र ते सकाळी झोपेतून उठत नसल्याने त्यांना अंबड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आजपर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत.

सध्या जरांगे पाटील यांची तब्येत ढासळत आहे. यामुळे सरकारवर दबाव वाढत असून राज्यात पाठिंबा वाढत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले असून आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे.
मृत्युमुखी पडलेला आंदोलक बीड जिल्ह्यातील संगम येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

दशरथ रायकर हे मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत आले होते. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे धाराशिवमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. मराठा समाजाकडून आज जिल्हाभर बंद पाळला जात आहे. धाराशिवमध्ये मराठा समाज बांधव रस्त्यावर येत असून आक्रमक पद्धतीने आंदोलन केले जात आहे.

सर्वांनी या बंदमध्ये स्वखुशीने सहभागी व्हावं असं आवाहन मराठा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. तरी येत्या काळात सरकारने लवकर प्रतिसाद दिला नाही तर अधिक आक्रमक आंदोलन करू असा इशाराही दिला आहे. यामुळे पुढे सरकार नेमकं काय भूमिका घेणार हे लवकरच समोर येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!