हवेलीत राष्ट्रवादी बंडोखोर विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार ! बाजार समितीच्या १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात !!


उरुळी कांचन : जयदीप जाधव
     हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक
मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवार (दि.२०) रोजी सर्वपक्षीय पॅनेल व राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल यांच्यात १५ जागांवर निवडणूकीची लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल मधून उमेदवारी मिळाली नाही म्हणून तिसरी आघाडी स्थापन करुन मैदानात उतरण्याची असंतुष्टांची वल्गना मात्र शमल्या असून बाजार समितीत राष्ट्रवादी विरुद्ध सर्वपक्षीय आघाडीअशी निवडणूक रंगणार आहे. बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
    प्रदिर्घ म्हणजे १९ वर्षाच्या कालखंडानंतर होत
असलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे अंतिम चित्र गुरुवार (दि.२० ) रोजी स्पष्ट झाले आहे. हवेली तालुक्यातील स्थानिक दोन सहकार  गटात निवडणूक होणे अपेक्षित असताना राष्ट्रवादीच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपशी हातमिळवणी करीत सर्वपक्षीय पॅनेलची उभारणी केली आहे. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष निष्ठेचा मुद्दा उपस्थित करीत अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे राष्ट्रवादी च्या पॅनेलची उभारणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध बंडोखोर असा सरळ सामना आता हवेली तालुक्यात पहायला मिळणार आहे.
     बाजार समितीसाठी गुरुवार (दि.२०) उमेदवारी अर्ज
माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी १९५ पैकी १३८ जणांनी अर्ज माघारी घेतले आहे. त्यामुळे एकूण १८ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. सहकारी संस्थांच्या ११ जागांसाठी २९उमेदवार., ग्रामपंचायत मतदारसंघात ४ जागांसाठी ११ उमेदवारी , व्यापारी मतदारसंघात२ जागांसाठी १२ उमेदवार तर हमाल मतदारसंघात १ जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. या लढतीपैंकी सेवा संस्थांच्या महिला गटात २
जागेवर समोरासमोर ४ उमेदवार रिंगणात आहेत. तर सेवा संस्थांच्या इतर मागासवर्गीय व भटक्या जाती / जमाती मतदारसंघात प्रत्येकी १ जागेसाठी सरळ २  उमेदवार आमनेसामने आहेत.
    दरम्यान बाजार समितीच्या व्यापारी व आडते या
३ जागांवर राष्ट्रवादी व सर्वपक्षीय आघाडीने उमेदवार उभे दिले नाहीत. या ठिकाणी बाजार समितीच्या व्यापारी गटांनुसार स्थानिक आघाड्या करुन उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या ठिकाणी विजयी झालेले उमेदवार हे कोणाला पाठिंबा दर्शविणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बाजार समितीच्या १५  जागांसाठी राष्ट्रवादी ने अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल तर सर्वपक्षीय पॅनेलने आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या वतीने जाहीर केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे:
अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” चे अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे 
(सेवा संस्था मतदार संघ) रोहिदास दामोदर उंद्रे, दिलीप काशिनाथ काळभोर, प्रशांत दत्तात्रय काळभोर, राजाराम आबुराव कांचन, प्रकाश चंद्रकांत जगताप, नितीन पंढरीनाथ दांगट, दत्तात्रय लक्ष्मण पायगुडे, शशिकांत वामन गायकवाड (इतर मागास प्रवर्ग), लक्ष्मण साधू केसकर (भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग) मनिषा प्रकाश हरपळे, सारिका मिलिंद हरगुडे (महिला प्रतिनिधी प्रवर्ग)
(ग्रामपंचायत मतदारसंघ )
सुदर्शन जयप्रकाश चौधरी, शुक्राचार्य हिरामण वांजळे, रवींद्र नारायणराव कंद, सत्यवान दगडू गायकवाड
“अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल”चे अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे : –
(सेवा संस्था मतदार संघ) शेखर सहदेव म्हस्के, संतोष आबासाहेब कांचन, अशोक सुदाम गायकवाड, योगेश बाळासाहेब शितोळे, दत्तात्रय दिनकर चोरघे, कुलदीप गुलाबराव चरवड, संदीप माणिकराव गोते, (नागरीकांचा इतर मागासप्रवर्ग) सचिन सुभाष घुले, सरला बाबुराव चांदेरे,  प्रतिभा महादेव कांचन, (महिला प्रतिनिधी प्रवर्ग), अर्जुन पिलाजी मदने (विमुक्त जाती व जमाती राखीव)
(ग्रामपंचायत मतदारसंघ )
राहुल रामचंद्र काळभोर, रामकृष्ण हेमचंद्र सातव, नवनाथ रोहिदास पारगे आबासाहेब कोंडीबा आबनावे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!