अल्पवयीन मुलास अमानुष मारहाण प्रकरणी हार्डवेअर मालकाला अखेर अटक; लोणीकाळभोर पोलिसांच्या कारवाईचे स्वागत…

उरुळीकांचन : चोरीच्या संक्षयातून अल्पवयीन निष्पाप सोळा वर्षीय मुलालाअमानुषपणे बेदम मारहाण करणाऱ्या हार्डवेअर मालकाला व एका अल्पवयीन मुलावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या अमानुष मारहाण प्रकरणात दुकानमालकाला पोलिसांनी अटक केल्याने या कारवाईचे स्वागत सर्व स्थरांतुन होत आहे.

नायगाव फाटा येथून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला लाठ्यांनी व पायाखाली तुडवून बेदम मारहाण झाल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. या प्रकरणानंतर समाजात संतापाची लाट उसळून मारहाण करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला
होता. या मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी म्हणून संतापाची भावना होती.
अखेर पोलिसांनी या प्रकरणात हार्डवेअर मालक रणजित कालुसिंग रावणा राजपूत (वय २८, रा.महादेव ट्रेडर्स,थेऊर फाटा,पुणे) याला गुन्हा दाखल करुन अटक केले आहे. तर एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पियुषची आई मनिषा संदीप शिंदे (वय ३५, रा.नायगाव फाटा,कुंजीरवाडी,ता.हवेली,जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान या कारवाईने नागरीकांनी समाधान व्यक्त केले असून लोणी काळभोर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे स्वागत केले आहे. दरम्यान बेपत्ता झालेल्या पियुश शिंदे या सोळा वर्षीय मुलाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून पियुषला उरुळीकांचन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
