हार्दिक पांड्याला डच्चू! मुंबई इंडियन्सला मिळाला नवा कॅप्टन, जाणून घ्या..

मुंबई : आयपीएल २०२५ मधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या नव्हे, तर सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. हार्दिक पांड्यावर बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटसंदर्भात कारवाई केल्यामुळे त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २३ मार्चला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. मात्र, या सामन्यात संघाचे नियमित कर्णधार हार्दिक पांड्या खेळू शकणार नाहीत. त्यामुळे सूर्यकुमार यादव हंगामातील पहिल्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळेल.
दरम्यान, गेल्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ठरलेल्या वेळेत ओव्हर पूर्ण करू शकली नाही. यामुळे बीसीसीआयच्या नियमांनुसार त्याला एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.