पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढला, रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने खळबळ, गेला अजून एक बळी…


पुणे : पुण्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येत असलेल्या गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची संख्या वाढतच आहे. आठवड्याभरातच पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या हा एक दुर्मीळ आजार असून हा आजार संसर्गजन्य नाही.

जानेवारी महिन्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या अचानकपणे वाढली असून, राज्यभरात GBS च्या रुग्णांची संख्या १२७ वर पोहोचली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेचा GBS मुळे मृत्यू झाला आहे. या मृत्यूचा कारण श्वसनक्रिया थांबणे आणि अर्धांगवायू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरात GBS चे रुग्ण जास्त आढळल्यामुळे महापालिकेने त्याठिकाणी अतिसार आणि उलट्या असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण केले. यानंतर जलस्रोतांसाठी परीक्षण करण्यात आले आणि त्यात ई-कोलाय व कॉलिफॉर्म जीवाणू आढळले. परिणामी, या पाण्याचे उपचार न करता वापरु नये, असे सुचविण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने केले आवाहन..

आरोग्य विभागाने पुणेकरांना पाणी गाळून आणि उकळून प्यायचे आवाहन केले आहे. तसेच, महापालिकेने सर्व सोसायट्यांना बोअरवेल आणि विहिरीचे पाणी तपासूनच वापरण्याचे सांगितले आहे. GBS च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणेकरांमध्ये तणावाचे वातावरण आहे आणि या आजाराबाबत असंख्य संभ्रम निर्माण झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!