वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! आषाढी वारीच्या तयारीसाठी पुण्यातील 22 ग्रामपंचायतींना 3.33 कोटींचा निधी..

पुणे : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाने पुणे जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींसाठी तब्बल 3 कोटी 33 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान महाराज, संत गोरा कुंभार महाराज आणि संत निळोबाराय महाराज यांच्या पालख्या दरवर्षी पुणे जिल्ह्यातून मार्गक्रमण करतात. या पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकरी सहभागी होत असल्याने त्यांच्या सोयीसुविधांसाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे.
पालखी मार्गावरील मुक्कामस्थळे आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने निधी वितरणास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

या निधीतून पालखी तळावरील जमिनीचे सपाटीकरण, स्वच्छतागृहांची उभारणी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरण, वीज आणि पाणीपुरवठा, स्वागत व निरोप कक्ष उभारणे तसेच वाहन आणि इंधन व्यवस्थेसाठी खर्च केला जाणार आहे.

यंदा पुणे जिल्ह्यात विविध संतांच्या पालख्यांचे 34 ठिकाणी मुक्काम, 58 ठिकाणी विसावा आणि 9 ठिकाणी निवारा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी ग्रामपंचायती आणि प्रशासन युद्धपातळीवर तयारी करत आहेत.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना’ अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेला एकूण 3 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 3 कोटी 33 लाख रुपये ग्रामपंचायतींसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात मंजूर निधीपैकी 10 टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले की, वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे पालखी सोहळ्याच्या तयारीला अधिक बळ मिळणार असून सुविधा उभारणीची कामे वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, शासनाकडून मिळालेल्या या निधीमुळे पालखी मार्गावरील गावांमध्ये विकासकामांना गती मिळणार असून यंदा