श्री क्षेत्र डाळींब बन येथील श्री विठ्ठलाची महापूजा; उरुळीकांचन परिसरात भविष्यात लॉजेस्टिक पार्क उभारणार; उन्नत मार्गात मेट्रोची सेवा उरुळीकांचन पर्यंत आणणार – आमदार ज्ञानेश्वर कटके यांची माहिती


उरुळीकांचन : पुर्व हवेली तालुक्यातील उरुळीकांचन हे शेवटचे उपनगरातील केंद्र समजून या ठिकाणी उन्नत मार्गातून मेट्रोची सेवा, रिंगरोडची कनेक्टिव्हिटीतसेच पुरंदर विमानतळाला हा भाग जवळचाठरत असल्याने या ठिकाणी भविष्यात हा भाग लॉजेस्टिक पार्क म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीने भविष्यात या परिसराचा रोडमॅप काढण्यात येईल असा विश्वास शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी व्यक्त केला आहे.

श्री क्षेत्र डाळिंब बन (ता.दौंड) येथील आषाढी एकादशीची श्री विठ्ठलाची महापूजा शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या हस्ते पार पडली. यावेळी ते बोलते होते. महापूजेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, दौंडचे पं.समिती सभापती सुखदेव चोरमले, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, दौंड पंचायत समिती सदस्य राजश्री म्हस्के, रामदास चौधरी,भाऊसाहेब कांचन, डाळींबचे सरपंच बजरंग म्हस्के तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले, प्रतिपंढरपूर म्हणून डाळींब बन येथील श्री विठ्ठलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पंढरपुरचा भक्तिचा ओढा प्रतिपंढरपूर म्हणून डाळींब बन विठ्ठलाच्या चरणी पूर्ण होत आहे. सांप्रदायिक सेवेतून सुसंस्कृत पिढी घडत चालली असून भक्तिचा व धर्माचा महिमा समाजातून पुढे जात आहे.

विकासाच्या दृष्टीने डाळींब बन देवस्थानच्या भक्तिनिवास स्थानचे काम होत असल्याची कौतुकाची बाब आहे. भविष्यात या भागाचे रुप विकसाने बदलणार असून दळणवळण व्यवस्था, व्यापारी केंद्र म्हणून या ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे. उन्नत मार्गात उरुळीकांचन पर्यंत मेट्रो, रिंग रोड, रेल्वे हब तसेच उरुळीकांचन येथूनच पुरंदर विमानतळाला मेट्रो जोडण्याचा माझा प्रयत्न असून भविष्यात हा भाग लॉजेस्टिक म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमात श्री विठ्ठल देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी प्रास्ताविकात श्री विठ्ठल देवस्थानला ‘ब ‘वर्ग तिर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे भाविकांसाठी येणाऱ्या सर्व सुविधा मिळून विकासकामे मार्गी लागत असल्याचे सांगून देवस्थानने भक्ति निवास उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांची मंजुरी मिळून काम सुरू केल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वस्त एल.बी.म्हस्के, तर आभार सागर म्हस्के यांनी मानले आहे.

हडपसर ते यवतला आवश्यक ठिकाणी रुंदीकरण..

प्रस्तावित हडपसर ते यवत या ३१.५किलोमीटरच्या इलिव्हेटेड उन्नत मार्गासाठी आवश्यक त्या ठिकाणी भूसंपादन करण्यात येणार आहे. चालू महामार्गावर ३१.५ मीटर रस्ता रुंदीकरण होऊन उड्डानपूल उतारस्थळी ५६.५ मीटर रुंदीकरण होणार असून त्या ठिकाणी भूसंपादन
होणार आहे. तर थेऊरफाटा , प्रयागधामफाटा व सहजपूर येथे एक्झिट(बाहेर ) पडण्याची रचना असल्याचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी पत्रकारांना सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!