Govinda : अभिनेता गोविंदा अहुजा यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश…

Govinda : लोकसभा निवडणूक २०२४ साठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. टप्प्याटप्प्यात उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच स्टार प्रचारकांच्याही याद्या जाहीर केल्या जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात आज दिग्गजांचे पक्षप्रवेश होत आहेत. अभिनेता गोविंदा यांचा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदाला उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोविंदा याआधी काँग्रेस पक्षाचा खासदार देखील राहिला आहे. तो लोकसभा निवडणूक याआधी निवडून आला आहे.
त्यानंतर तो आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असून त्याला मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुसरीकडे अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करिना कपूर या दोन्ही बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जावून भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांचादेखील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.