चांगल्या हसत्या-खेळत्या घरांमध्ये सासू-सुना, जावा-जावा, यांच्यात सरकारने भांडणं लावली, सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप..

पुणे : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे. तसेच अनेक बहिणींची नावे देखील कमी करण्यात आली आहेत. असे असताना आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरु झाली आहे.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे निकष पावसाबाबत लोकांचे अंदाज बदलावे त्याप्रमाणे बदलत आहेत. पण त्यामुळे चांगल्या हसत्या-खेळत्या घरांमध्ये सासू-सुना, जावा-जावा, ननंद-जाऊ यांच्यात भांडणं लागली आहेत. ही भांडणं आजकाल विकोपाला जाऊ लागली आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
यामुळे अनेक घरांची शांतता बिघडली आहे. शासनाने अक्षरशः घराघरात भांडणं लावली असं म्हणता येईल. आता शासनानेच ही भांडणं सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सरसकट पात्र महिलांना या योजनेचा लाभ द्यावा. अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यामुळे सरकार नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे. तसेच अनेक बहिणींची नावे देखील कमी करण्यात आली आहेत. तसेच सरकारने २१०० रुपयांचे दिलेले आश्वासन देखील पूर्ण केले नाही. यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे सरकारवर टीका होत आहे.
लाडकी बहीण योजना सुरु करून सरकारने बहिणींची मते घेतली. मात्र नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप देखील सरकारवर केला जातो. आता ही योजना देखील बंद होईल असे म्हटले जाते. यामुळे आगामी काळात ही योजना बंद होणार की अशीच सुरु राहणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.