बीडमध्ये पुन्हा गुंडाराज!! वाल्मिक अण्णाच्या बातम्या का पाहतोस म्हणत तरुणाला जीवघेणी मारहाण, तुझाही संतोष देशमुख’ करण्याची धमकी…


बीड : जिल्ह्यातील धारूर गावात एका तरुणाला वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवर पाहिल्या म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच, यापुढे अशा बातम्या पाहिल्यास संतोष देशमुखसारखीच तुझी अवस्था करू, अशीही धमकी देण्यात आली आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, अशोक शंकर मोहिते हा आपल्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहत होता. त्याच वेळी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप त्या ठिकाणी आले. वाल्मिक अण्णाच्या बातम्या का पाहतोस? असा प्रश्न विचारून त्यांनी अशोकला शिवीगाळ केली.

तसेच यावेळी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पुढे मुंडे साहेब आणि वाल्मिक अण्णांच्या बातम्या पाहिल्यास तुझीही संतोष देशमुखसारखी अवस्था करू, अशी धमकी त्यांनी दिली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अशोक मोहितेवर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये आधीच जातीय तणाव वाढला असताना अशा घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा असामाजिक घटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने झाले असले तरी कृष्णा आंधळे हा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. एसआयटी आणि सीआयडीच्या १०-१२ पथकांचा तपास सुरू असतानाही कृष्णा आंधळेला अटक झाली नाही, यामुळे संशय वाढत आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!