पुणेकरांसाठी आनंदाची बातमी!! आता होणार अजून एक नवीन रेल्वेमार्ग, पुणे स्टेशनचा ताण होणार कमी…

पुणे : पुणे एक मोठं शहर म्हणून देशभरात ओळखलं जातं. याठिकाणी शिक्षण, आयटी हब, एमआयडीसी असल्याने पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड प्रमाणात वाहतुकीचा ताण येतो. व त्यामुळे अनेक धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना वेळेवर फलाट उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
आता मात्र हा त्रास कमी होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आता तळेगाव- उरळी या नव्या मार्गाकरिता डीपीआर म्हणजेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. यामुळे हे काम लवकर झालं तर अनेक समस्या सुटणार आहेत.
आता त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. नवीन तळेगाव- उरळी या नवीन मार्गाचा डीपीआर आता अंतिम टप्प्यात असून हा मार्ग चाकण आणि रांजणगाव या मार्गे असणार आहे. याच परिसरात मोठ्या प्रमाणावर रोडची वाहतूक देखील कोंडी होते. यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात.
साधारणपणे 70 किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग असून त्यासाठी तब्बल 7000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग म्हणजे एक संजीवनीच मिळणार आहे. यामुळे याकडे सरकारने देखील लक्ष घातले आहे. यामुळे चाकण व रांजणगाव या औद्योगिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या भागांना रेल्वेची सोय होणार आहे.
यामुळे उद्योगधंद्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. यातून अनेक रोजगार देखील निर्मिती होतील. दररोज सुमारे 72 प्रवासी गाड्यांना पुणे रेल्वे स्थानकाच्या दोन्ही होम सिग्नलवर क्रॉसिंगकरिता थांबावे लागते. दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या देखील मुंबईतून इकडे येतात. यामुळे मोठा ताण येतो.
यामुळे आता रेल्वे बोर्डाने तळेगाव ते उरळी दरम्यान नवीन रेल्वे मार्गीका टाकण्याचा विचार केला आहे. तिचा डीपीआर देखील आता अंतिम टप्प्यात आहे. प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू होईल.