मोठी बातमी! महिलांसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आता एसटी 50 टक्केच तिकीट…!

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामुळे अनेकांना याचा मोठा फायदा होणार आहे. यामध्ये महिलांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासात महिलांना तब्बल ५० टक्के सूट देण्यात आली आहे.

यामुळे महिलांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. यामध्ये राज्यांतर्गत प्रवास करताना महिलांना फक्त निम्मे तिकिट द्यावे लागणार आहे. राज्यात लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
तसेच महिलांच्या सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यंटन धोरण तयार कऱणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केला. या अर्थसंकल्पाकडे राज्याचे लक्ष लागले होते. शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांकरिता केंद्र सरकारच्या मदतीने ५० वसतीगृह स्थापन करणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यामुळे महिलांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना देखील फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला.
