विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कॉलेज सुरू होताच डी- मार्टकडून खास ऑफर, खरेदीसाठी मोठी गर्दी..

पुणे : सध्या शाळा महाविद्यालय सुरू झाली असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कॉलेजचे शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंवर डी-मार्टकडून मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. याचाच फायदा घेण्यासाठी पालक देखील डी-मार्टमध्ये गर्दी करत आहेत.

यामध्ये मोठ्या प्रमाणात सवलत असल्याने पैशांची बचत होत आहे. याठिकाणी स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल्स, कॉलेज बॅकपॅक, लॅपटॉप बॅग्स, वायर्ड हेडफोन, ट्रिमर, हेअर ड्रायर तसेच बेल्ट, सनग्लासेस यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूही किफायतशीर दरात उपलब्ध आहेत. यामुळे पैशांची बचत होत आहे.
नोटबुक, फाइल्स, पेन, A4 पेपर, प्रोजेक्ट साहित्य आणि इतर स्टेशनरीवर 15 ते 30 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. यामुळे खरेदीसाठी अनेकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे कॉलेजसाठी लागणाऱ्या बहुतेक आवश्यक वस्तू एकाच ठिकाणी सवलतीच्या दरात उपलब्ध असल्याने विद्यार्थी आणि पालकांना कमी खर्चात खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

तसेच खेळातील फुटबॉल, बास्केटबॉलसह विविध क्रीडा साहित्यावरही विशेष ऑफर्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे डी-मार्टमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. शाळा सुरू झाली की खर्चाचे कामे म्हणजे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करावे लागते.

दरम्यान, यामुळेच शालेय वस्तूंवर डी-मार्टकडून मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. याचाच फायदा घेण्यासाठी पालक देखील डी-मार्टमध्ये गर्दी करत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात देखील पैसे वाचवायचे असल्यास याठिकाणी पालकांना संधी निर्माण झाली आहे.