पुणेकरांसाठी खुशखबर! आता मेट्रो तिकिटासाठी स्टेशनवर रांगेत उभं राहायची गरज नाही; मोबाईलवरील ‘त्या’ ॲपवरूनच ५०% सूटसह थेट QR तिकीट मिळवा


पुणे : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता मेट्रोचा प्रवास अधिक स्मार्ट, जलद आणि किफायतशीर होणार असून प्रवाशांना तिकीटासाठी स्थानकावर रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.

प्रसिद्ध कॅब सेवा कंपनी ‘Uber’ ने पुणे मेट्रोसोबत भागीदारी करत आपल्या अधिकृत ॲपवर QR आधारित मेट्रो तिकीट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना एकाच ॲपवरून कॅब, ऑटो आणि मेट्रो तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईनंतर आता पुणे हे ‘Uber’ ॲपवर थेट मेट्रो तिकीट सुविधा मिळणारे देशातील पाचवे शहर ठरले आहे. वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ही सेवा पुणेकरांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांनी सांगितले की, प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी ही भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे. या नव्या सुविधेच्या प्रचारासाठी सुरुवातीच्या काळात प्रवाशांना मेट्रो तिकिटावर ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे.

‘Uber’ ॲपवरून मेट्रो तिकीट बुक करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. प्रवाशांनी ॲप उघडून ‘Metro’ पर्याय निवडायचा, प्रवासाचे स्थानक निवडायचे आणि ऑनलाइन पेमेंट करून थेट डिजिटल QR तिकीट मिळवायचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!