पुणेकरांसाठी खुशखबर;’ या’ दोन ठिकाणी नवीन मेट्रो स्थानके उभारली जाणार..


पुणे : नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या स्वारगेट स्थानके ते कात्रज या विस्तारित मार्गिकेवर दोन नवीन स्थानके उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. बालाजीनगर व बिबवेवाडी अशी दोन मेट्रोस्थानके नव्याने उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतुक कोंडीतून सुटका मिळणार आहे.

महाराष्ट्र सरकारने दोन नव्या मेट्रो स्थानकांना मंजुरी दिली आहे. या मेट्रोस्थानकासाठी तब्बल 683 कोटी रुपये मंजूर केले आहेत. बालाजीनगर व बिबवेवाडी अशी दोन मेट्रो स्थानके नव्याने उभारण्यात येणार असून, त्यासाठीच्या या प्रकल्पासाठी राज्य सरकार व वित्तीय संस्थांसह पुणे महापालिकेला 227.42 कोटी रुपयांचा वाटा उचलावा लागणार आहे.स्वारगेट ते कात्रज या मार्गावर सुरुवातीला केवळ तीनच स्थानकांचा समावेश होता. जवळपास साडेपाच किमी लांबीच्या या मार्गिकवर आणखी दोन ठिकाणी स्थानके हवीत, अशी आग्रही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरशनला (महामेट्रो) केली होती. या मागणीची दखल घेऊन महामेट्रोने बालाजीनगर आणि बिबवेवाडी ही स्थानके वाढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे या भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

या दोन नव्या मार्गीकेमुळे सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ६८३.११ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.तसेच या स्थानकामुळे बिबवेवाडी, बालाजीनगर, धनकवडी परिसरातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. मेट्रोच्या स्थानकांमधील अंतरही कमी होणार आहे. प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!