GOOD NEWS! लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 4,500 रुपये जमा होणार…पण कधी?


राज्यातील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. मात्र, ई-केवायसी प्रक्रिया आणि पोटनिवडणुकांमुळे गेल्या काही महिन्यांपासून हप्ता रखडला होता. आता हा निधी पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद झळकणार आहे.

फेब्रुवारी 2026 मध्ये शेवटचा हप्ता जमा झाल्यानंतर मार्च आणि एप्रिलचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक महिलांमध्ये “आपला अर्ज रद्द झाला का?” अशी चिंता होती. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार थकीत हप्ते जमा करण्याच्या तयारीत असून काही महिलांना एकत्रित रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काहींच्या मते 3000 तर काही ठिकाणी 4500 रुपयांपर्यंत रक्कम खात्यात येऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे.

30 एप्रिल रोजी ई-केवायसीची अंतिम मुदत संपल्यानंतर अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेनंतर सुमारे 54 लाख महिला अपात्र ठरल्या असून त्यांचा लाभ बंद झाला आहे. तर 1 कोटी 89 लाख पात्र महिलांना योजनेचा लाभ सुरू राहणार आहे. अपात्रांची संख्या वाढल्याने सरकारचे जवळपास 1200 कोटी रुपये वाचल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निधी वितरणावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत “खात्यात पैसे कधी आणि किती?” याबाबत स्पष्ट चित्र समोर येणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे लक्ष सरकारच्या पुढील घोषणेकडे लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!