अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याची रॉकेट भरारी, दरात झाली मोठी वाढ, जाणून घ्या…


नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यानंतर सोने आणि चांदीच्या किंमतीत तुफान वाढ झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात किंमतीत मोठी घसरण झाली. तर त्यानंतर दरवाढीचा आलेख दिसून आला. सोने १२०० रुपयांनी वधारले. तर चांदी ३ हजारांनी उसळली. ऐन अर्थसंकल्पाच्या दिवशीच किमती वाढल्या आहेत.

गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. मागील दोन आठवड्यात सोन्यात ३००० रुपयांची दरवाढ झाली.

तसेच या आठवड्याच्या सुरुवातीला अनुक्रमे १७० आणि ३२० अशी ४९० रुपयांची घसरण झाली. तर २९ जानेवारीला सोने ९२० रुपयांनी, तर ३१ जानेवारी रोजी १३१० रुपयांनी महागले. आता २२ कॅरेट सोने ७७,४६० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ८४,४९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

सरकार सोन्यावरील आयात शुल्क म्हणे कस्टम ड्युटी वाढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा झाली. दरम्यान, मागच्या वर्षी म्हणजे जुलै २०२४ मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्के केले होते.

आयात शुल्कातील ९ टक्के कपात ही आयात शुल्कातील आतापर्यंतची सर्वात मोठी कपात होती. तर २०१३ नंतर पहिल्यांदाच आयात शुल्क १० टक्क्यांच्या खाली आले. दरम्यान, चांदीने या महिन्यात दरवाढीला ब्रेक लावला असला तरी अनेकवेळा मोठी झेप घेतली.

२४ जानेवारीला १ हजारांची दरवाढ तर २७ जानेवारीला १ हजारांची घसरण झाली. नंतर ३० जानेवारी रोजी चांदी २ हजारांनी वधारली. ३१ जानेवारी रोजी त्यात हजारांची भर पडली. एक किलो चांदीचा भाव ९९,६०० रुपये इतका आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!