सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, चांदीचे दरही नरमले ; खरेदीदारांची लगबग…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दारात मोठ्या प्रमाणात वाढ सुरू झाली होती.आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता आणि डॉलटर किंमत यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे सांगण्यात येत होतं.पण आता लग्नसराई सुरू होताचं पुन्हा एकदा सोन्याचे आणि चांदीचे दर कमी झाले आहेत. दोन्हींच्या भावात घसरण सुरू झाली आहे. भारतात 16 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,508 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,465 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,381 रुपये आहे. भारतात आज रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,650 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,080 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,810 रुपये आहे.

तसेच चांदीचा भाव प्रति ग्रॅम 169 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,69,000 रुपये आहे.याआधी भारतात 15 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,703 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,644 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,527 रुपये होता. भारतात 15 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,16,440 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,27,030 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,270 रुपये होता. भारतात 15 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 173.20 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,73,200 रुपये होता.

.भारतात 14 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,866 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,791 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,648 रुपये होता. भारतात 14 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,17,910 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,28,660 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 96,480 रुपये होता. भारतात 14 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 173.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,73,100 रुपये होता. दरम्यान आता लग्नसराईमुळे सोन्या चांदीच्या दरात घसरून झाल्यामुळे खरेदीदारांची लगबग सुरू झाली आहे. खरेदिदारांना या घसरणीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!