सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सात दिवसांनी चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव

पुणे : सोन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबतच्या संकेतांचा परिणाम जागतिक बाजारासह देशांतर्गत सराफा बाजारावरही दिसून आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून, सात दिवसांच्या स्थिरतेनंतर चांदीचे दरही खाली आले आहेत.
गेल्या दोन दिवसांत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात एकूण 230 रुपयांची, तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रुपयांची घट झाली आहे. आज दिल्लीमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रत्येकी 10 रुपयांची किरकोळ घसरण नोंदवली गेली.

चांदीही झाली स्वस्त
सलग सात दिवस स्थिर राहिल्यानंतर आज 1 किलो चांदीच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या दिल्लीसह मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये 1 किलो चांदीचा दर ₹2,34,900 इतका आहे.


आजचे सोन्याचे दर (10 ग्रॅम)
दिल्ली
24 कॅरेट : ₹1,44,140
22 कॅरेट : ₹1,32,140
18 कॅरेट : ₹1,08,140
मुंबई
24 कॅरेट : ₹1,43,990
22 कॅरेट : ₹1,31,990
18 कॅरेट : ₹1,07,990
कोलकाता
24 कॅरेट : ₹1,43,990
22 कॅरेट : ₹1,31,990
18 कॅरेट : ₹1,07,990
चेन्नई
24 कॅरेट : ₹1,43,990
22 कॅरेट : ₹1,31,990
18 कॅरेट : ₹1,10,140
बंगळुरू
24 कॅरेट : ₹1,43,990
22 कॅरेट : ₹1,31,990
18 कॅरेट : ₹1,07,990
हैदराबाद
24 कॅरेट : ₹1,44,210
22 कॅरेट : ₹1,32,190
18 कॅरेट : ₹1,08,150
लखनऊ
24 कॅरेट : ₹1,44,140
22 कॅरेट : ₹1,32,140
18 कॅरेट : ₹1,08,140
पाटणा
24 कॅरेट : ₹1,44,040
22 कॅरेट : ₹1,32,040
18 कॅरेट : ₹1,08,040
जयपूर
24 कॅरेट : ₹1,44,140
22 कॅरेट : ₹1,32,140
18 कॅरेट : ₹1,08,140
अहमदाबाद
24 कॅरेट : ₹1,44,040
22 कॅरेट : ₹1,32,040
18 कॅरेट : ₹1,08,040
सोनं का स्वस्त झालं?
बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने महागाईबाबत सावध भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे व्याजदर कपातीबाबत अनिश्चितता वाढली असून जागतिक गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. याचाच परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला आहे.
तज्ज्ञांच्या मते, या आठवड्यात अमेरिकेतील नॉन-फार्म पेरोल (NFP) अहवाल, रोजगाराशी संबंधित आर्थिक आकडेवारी, डॉलरमधील चढ-उतार आणि कच्च्या तेलाच्या किंमतींवर बाजाराचे लक्ष असेल. या घडामोडींवरून पुढील काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.