मुलाला चांगले मार्क देऊ, आम्हाला खुश कर…,दोन शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर बलात्कार, घटनेने उडाली खळबळ


बुलढाणा : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दोन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आईवरच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलांना चांगले मार्क देऊ, पहिला नंबर आणू अशे आमिष दाखवत दोन शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या आईवरच वेळोवेळी बलात्कार केला. याप्रकरणी वर्गशिक्षकासह सहकारी शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

तुझ्या मुलाला चांगले मार्क देवून पहिला नंबर आणू, यासाठी आम्हाला खुष कर , अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकाने आणि त्याच्या सहकाऱ्याने एका विद्यार्थ्याच्या आईवर अनेक वेळा अत्याचार केला. मलकापूर शहरात ही भयानक घटना घडली आहे.

मलकापूर येथील नूतन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे या दोन्ही आरोपी शिक्षकांनी एका ३४ वर्षीय पीडित महिलेला आमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर १० सप्टेंबर २०२४ ते २२ एप्रिल २०२५ पर्यंत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. तसेच त्या दोघांना खुश ठेवले नाही तर तिला आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती, असे महिलेने फिर्यादीत नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, याप्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्गशिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक, अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्या नराधम दोन शिक्षकांना अटकही केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!