आपल्या मैत्रिबाबत आई-वडिलांना सांगेल, तुझा काटा काढेल असे धमकावत 16 वर्षीय मुलीवर बलात्कार…!


पुणे : पुणे शहरातील मुंढवा परिसरात राहणार्‍या एका 16 वर्षीय मुलीला वारंवार धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी 20 वर्षीय युवकाला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने पोलिसांकडे फिर्याद दिली होती याआधारे पोलिसांनी युवराज चौगुले (20, घोरपडी, पुणे) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

 

 

सविस्तर वृत्त असे की, आरोपी युवराज चौगुले हा फिर्यादीच्या परिसरात रहावयास आहे. त्याने पिडीत मुलीला वारंवार त्रास दिला आणि त्यानंतर मैत्रिपुर्ण संबंध प्रस्थापित केले. मैत्रिबाबत आई-वडिलांना सांगेल, तुझा काटा काढेल अशी धमकी देवुन युवराज चौगुलेने पिडीत मुलीचा लैंगिक छळ केला आणि तिच्यावर अत्याचार केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी युवराज चौगुलेला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बिनवडे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!