आता जनतेला मिळणार सुरक्षित सुधारित असे ‘आधार’…!

द्वि-स्तरीय सुरक्षा व कृत्रिम बुद्धिमत्ता च्या नाविन्यपूर्ण बदलांसहित....


नवी दिल्ली : देशातील लोकांचे आधार आता अधिक सुरक्षित झाले आहे. त्यामूळे देशभरात कुठेही तूमची फसवणूक केली जात असेल तर ते तूम्हाला लगेच समजू शकते.

आता फसवणूकीचे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने आधार कार्डमध्ये नवीन तांत्रिक सुधारणा केल्या आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) भारतात लोकांना आकार नंबर देत सर्वत्र आधार कार्ड बनवते. युआयडीएआयने या आठवड्यात आधार संबंधीत सुरक्षेसाठी नवीन द्वि-स्तरीय सुरक्षा यंत्रणा सुरू केली आहे. यात आधार बेस्ड फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आणि स्पूफिंग प्रयत्नांची जलद ओळख याचा समावेश आहे. युआयडीएआयच्या मते, आर्टिफिशियल इंटेलीजेंस आणि मशीन लर्निंग (एआय/एमएल) आधारित सुरक्षा प्रणाली आता कॅप्चर केलेल्या फिंगरप्रिंटची सजीवता तपासण्यासाठी फिंगर माइनुटिया आणि फिंगर इमेज या दोन्हींचा वापर करेल.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगवर आधारित ‘आधार’

यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगवर आधारित ही सुरक्षा यंत्रणा प्राधिकरणानेच विकसित केली आहे. आधार कोणत्या व्यक्तीचे आहे हे तपासण्यासाठी आधारकार्डवर असलेल्या बोटाचे ठसे तपासले जातात. संबंधीत व्यक्तीच्या फिगरप्रिंटची सत्यता पडताळण्यासाठी कार्डवर असलेल्या फिगरप्रिंट पैटर्न यात बोटाच्या गडद आणि हलक्या रेषांची सत्यता पडताळते तर द्विस्तरीय प्रणालीमध्ये आधारचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होते.

मदत मिळवण्यासाठी घेऊ शकता ‘आधारमित्र’ चॅटबॉट ची मदत

यूआयडीएआयने आर्टिफिशियल इंटेलीजेंस (एआय) आणि मशीन लर्निंगने सुसज्ज आधार चॅटबॉट लॉन्च केलाय. आधार मित्र नावाच्या या चॅटबॉटद्वारे ग्राहकांना त्यांच्या आधारशी संबंधित सर्व माहिती त्वरित मिळू शकणार आहे. यामध्ये आधार पीव्हीसीची टेटस, रजिस् आणि तक्रारी ट्रॅक करणे आणि आणि त्याची रियल टाइमसंबंधित माहिती मिळवता येऊ शकेल. यूआयडीएआयच्या नवीन चॅटवॉट ‘आधार मित्र’ वरून अनेक माहिती त्वरित मिळवू शकतात. यामध्ये आधार केंद्राचे लोकेशन. नावनोंदणी किंवा अपडेटचे टेटस आणि व्हेरिफिकेशन, पीव्हीसी कार्ड ऑर्डरची स्थिती. तक्रार करणे आणि त्याचे स्टेटस जाणून घेणे. इनरोलमेंट सेंटरचे लोकेशन. अपॉइंटमेंट बुकिंग आणि व्हिडिओ फ्रेम इंटीग्रेशन यासारखी माहिती उपलब्ध असेल. हा चॅटबॉट तुम्हाला टेक्स्ट मेसेजसह व्हीडिओद्वारेही माहिती देईल. आधारच्या ताज्या माहितीनुसार ते वेळोवेळी अपडेट केले जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!