गौतमी पाटील लग्नबंधनात अडकणार? म्हणाली,”असा’ पुरुष माझ्या आयुष्यात…

मुंबई : नृत्यांगणा आणि सोशल मीडिया स्टार नाव अल्वावधीतच महाराष्ट्रभर लोकप्रिय झालं आहे. आपल्या लावणी आणि सौंदर्याने गौतमी चाहत्यांना घायाळ करत असते. गौतमीचा डान्स पाहायला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. आता नुकतचं एका मुलाखतीत गौतमीने पहिल्यांदाच लग्नाबाबत भाष्य केलं आहे.
यामध्ये तिने असं वक्तव्य केलं आहे की सगळीकडे खळबळ उडाली आहे. यावेळी गौतमीने पहिल्यांदाच लग्नाबाबत भाष्य केलं आहे. गौतमी म्हणाली, पहिल्यापासून मी आणि माझी आईच राहिलो आहेत. आमच्या घरात ना वडील ना भाऊ, माझा कधीच कोणत्या पुरुषासोबत वैयक्तिक संबंध आलेला नाही. घरातील सर्व जबाबदाऱ्या मी आणि माझ्या आईनेच घेतल्या आहेत. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. याच कारणाने मला लग्न करायचं आहे”. अस गौतमी म्हणाली आहे.
त्याचबरोबर ती पुढे म्हणाली, “मला पैसे वगैरे काही नको फक्त आहे त्या परिस्थितीमध्ये साथ देणारा जोडीदार हवा. त्यामुळे ज्यावेळी असा मुलगा मला मिळेल त्यावेळीच मी लग्नाचा विचार करेन. लवकरच लग्नबंधनात अडकण्याची माझी इच्छा आहे”. असं देखील गौतमी म्हणाली आहे.