Gautami Patil : गौतमीचा कार्यक्रम अन् राडा ठरलेले समीकरण, पोलिसांकडून लाठीचार्ज, नेमकं घडलं काय?
Gautami Patil परभणी : डान्सर गौतमी पाटील सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असतो. तिच्या कार्यक्रमात अनेकदा गोंधळ होत असतो. तिच्या (Gautami Patil) कार्यक्रमांना तुफान गर्दी असते.
ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येते. तिचे लाखो चाहते आहेत. फक्त तरुणच नाही तर तिचे कार्यक्रम सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. (Gautami Patil)
अनेकदा परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर पोलिसांना तरुणांवर लाठीचार्ज करावा लागतो. आता असाच प्रकार परभणीत घडला आहे.
भाजप विधानसभा अध्यक्ष आनंद भरोसे यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे केले होते.
यावेळी शेकडो लोकांनी कार्यक्रमासाठी गर्दी केली होती. काही लोकांनी हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. खुर्च्या फेकफेकी, तोडफोड करण्यात आली. यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला.
दरम्यान, गौतमी (Gautami Patil) आणि तिचे सहकारी व्हॅनिटी व्हॅनमध्ये निघून गेले. गोंधळ शांत झाल्यांनतर पुन्हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. मात्र गौतमी निघून गेली. यामुळे पुन्हा एकदा कार्यक्रमात राडा झाल्याचे दिसून आले.
कडक बंदोबस्त असला तरी गौतमीच्या कार्यक्रमात राडा होणारच याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. यामुळे तिच्या पुढील कार्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. अनेकदा परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर पोलिसांना तरुणांवर लाठीचार्ज करावा लागतो.